Talegaon-Dabhade : आपल्या कामाला छंद बनवा – संजय भास्कर जोशी

एमपीसी न्युज – ‘नैतिक आणि वैध मार्गाने मिळविलेली संपत्ती योग्य असते. त्यामुळे आपल्या कामाला छंद बनवून पुढे जात राहिलात तर यश हमखास आहे.(Talegaon-Dabhade) यासोबत आयुष्याला नैतिकतेचे पाठबळ पुस्तके देतात म्हणून विद्यार्थीदशेत वाचनाचा छंद जोपासायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी व्यक्त केले.

येथील इंद्रायणी महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे विविध विभागांचे विभागप्रमुख,प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बोलताना जोशी म्हणाले की,’कार्पोरेट क्षेत्रात एक विशिष्ठ काळ अनुभव घेऊन मी थांबलो.आयुष्यात सगळी मजा केली. सुंदर जगाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनो आता कष्ट करा आणि आयुष्यभर मजा करा नाहीतर आता मजा करत बसले तर पुढील आयुष्य हे कष्टप्रद असेल’ हा मंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.(Talegaon-Dabhade)आपल्या आयुष्यालाही संगीतासारख्या मात्रा असायला हव्यात म्हणजे ते नैतिकतेच्या चौकटीत बसते असे म्हणत आपल्या भाषणातून त्यानी स्वानंद, भाषा,पूर्णानंद,दाद, प्रसाद, लिहिणे, राजहंसी वृत्ती आणि स्मरण अशा आठ मात्रा विद्यार्थ्यांना सांगितल्या. यावेळी ‘सेल्फी विथ बुक’या पुस्तक अभिप्राय स्पर्धेत यश मिळविलेल्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Traffic jam : नदीपात्रातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

आपल्या अध्यक्षीय भाषणात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की,वाचनाने समृद्ध समाज घडत असतो.सन्मानाने जगायचे असेल तर वाचनाचा कणा माणसाला असायलाच हवा.आज विद्यार्थी मानसिकतेवर समाजमाध्यमांचा पगडा अधिक आहे आणि त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात हातात पुस्तके घेऊन वाचन करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही,(Talegaon-Dabhade) विद्यार्थ्यांनी किमान महिन्याभरात एखाद्या पुस्तकाचे वाचन करायला हवे  असे प्राचार्य मलघे म्हणाले. यावेळी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अस्वस्थ भवताल या कविता संग्रहातील ग्रंथालयावर आणि पुस्तकांवर रचलेली कविता सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले. यावेळी त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे निमित्त,महत्त्व यांचा परिचय करवून देत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पाहुण्यांचा परिचय प्रा. सत्यजित खांडगे यांनी करवून दिला.(Talegaon-Dabhade) यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.