Traffic jam : नदीपात्रातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज पुण्यातील नदीपात्रातून एरंडवनेकडे जाणाऱ्या मार्गावर रोज सायंकाळी वाहतूक कोंडी पहाण्यास मिळत आहे. (Traffic jam) अरुंद रस्ता चारचोकी वाहनांची गर्दीमुळे येथे अर्धा ते एक तास या 10 ते 15 मिनीटांच्या रस्त्यासाठी लागत आहेत. 

रस्ता अरुंद असल्याने हा फक्त दुचाकी साठी योग्य आहे तरी नागरिक फोरव्हीलर आणि रिक्षा घेऊन येतात त्यामुळे अनेकवेळा या भागात वाद देखील झाले आहेत, (Traffic jam) अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिक आशिष भोसले यांनी सांगितले.

MNS complaint : सांगवीतील इंदिरा गांधी हॅास्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, मनसेची वरिष्ठांकडे तक्रार

याठिकाणी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव अनधिकृत घरांचे बांधकाम पाडले, पण विटा,मोठे दगड, फरश्या माती यांचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडलेले आहेत.(Traffic jam) त्यामुळे वाहतुकीस अडथळा आणि ट्राफिक मुळे त्या वस्तू पायाला लागून जखमा होण्याच्या घटना रोज निदर्शनास येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.