MNS complaint : सांगवीतील इंदिरा गांधी हॅास्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, मनसेची वरिष्ठांकडे तक्रार

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे)ने स्व. इंदिरा गांधी दवाखन्या(जुनी सांगवी) येथील डॉक्टरांचा हलगर्जीपणा बद्दल वरिष्ठान्ना भेटून काल तक्रार केली आहे. (MNS complaint) अशी माहिती राजू दत्तू सावळे, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष, मनसे यांनी दिली.

काल रात्री पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जुनी सांगवी दवाखान्यात सांगवीतील रूग्णावर “अजब आणि गजब गलथान प्रकार पहायला मिळाला. ”  एक महिला प्रसुती करीता गेली असता तिला अतिशय त्रास सहन करावा लागला. येथे मानधनावर असलेले डॅाक्टर जागेवर नव्हते असे समजले. दवाखान्यात या महिलेनी आपली स्वतःची प्रसुती तिने स्वतःच्या हाताने स्वतः केली त्यावेळेस बाळ खाली ट्रेमध्ये पडले व डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे नंतर डॅाक्टरांनी जवळच्या सांगवीतील भालेराव यांच्या दवाखन्यात पाठवले नंतर डॅाक्टर आले पण बाळाला 108 ॲब्युलन्समध्ये पाठवायला हवे होते मात्र या बाळाला नातेवाईकांनाच घेऊन जावे लागले. हा सर्व प्रकार दवाखन्यातील त्याच रूग्णानी व नातेवाईकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितला. हा प्रकार ऐकून आम्ही थक्क झालो.असे मनसेचे पदाधिकारी म्हणाले.

Chandrakant Patil : कोरोना कालावधीत पोलीस पाटलांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

या बाळाला ज्युपिटर हॅास्पिटल मध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला पण त्यांनी पुन्हा येथेच स्व.इंदिरा गांधी दवाखान्यात आणले व आज त्याबाळावर उपचार चालू आहेत.(MNS complaint) हे बाळ आत्ता ठिक आहे परंतु गरज नसताना रात्री 1 वाजता इतर ठिकाणी नातेवाईकांना सैरावैरा पळविण्याचे काम यांनी केले. यात आईचे किंवा बाळाला काही झाले असते तर याला जबाबदार कोण ? असा नातेवाईकांना व आम्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांना प्रश्न पडला आहे.

 

आम्ही स्व.इंदिरा गांधी प्रसुती दवाखन्यात सकाळी 1.15 वाजता महिला मनसे पदाधिकाच्या सोबत थेट येथिल डॅा.तृप्ती मंगेश सागळे (प्रभारी वैद्यकिय अधिकारी) यांची भेट घेऊन सांयकाळी झालेली सर्व हकिगत सांगितली व त्यांनी सर्वांची तक्रार ऐकून घेतली. रात्री जे कोणी डॅाक्टर होते त्यांच्या विचारणा केली तर काहीना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी  सांगितले कि, यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना घडणार नाही.(MNS complaint) तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊच सर्व डॅाक्टरांना कल्पना देऊ तसेच या पुढील बाळाची व आईची सर्व योग्य व चांगली ट्रिटमेन्ट जबाबदारीने देऊ असे आश्वासन दिले आहे. जर यानंतर दवाखण्यात काही अनुचित प्रकार घडला तर मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.

यावेळी मनसेच्या अश्विनी बांगर (शहरअध्यक्ष), राजू सावळे(शहरउपाध्यक्ष), अनिता पांचाळ, वैशाली बोत्रे तसेच साईराज भोसले सांगवी शाखा अध्यक्ष इ. उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.