World food day : जागतिक पातळीवर शाश्वत अन्न सुरक्षासाठी अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – डॉ. स्मिता लेले.

एमपीसी न्यूज –  जेवणात खाद्यपदार्थांचा समावेश हा संतुलित असला पाहिजे.(World food day) त्यामुळे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते. जागतिक पातळीवर शाश्वत अन्न सुरक्षासाठी अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत कार्यक्रमासाठी मुंबई येथील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेच्या माजी संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागा मार्फत जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. स्मिता लेले या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना पारंपारिक आहार ज्ञान आणि आधुनिक आहार शास्त्र यांची सांगड घालत सकारात्मक आणि सुखी जीवनाचा गुरुमंत्र दिला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे उपस्थित होते. कृषी विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अन्न सुरक्षा वाढवता येईल यासंदर्भात त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.(World food day) अन्न सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी येणाऱ्या काळात विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यी महत्त्वाची भूमिका बजावतील असे त्यांनी नमूद केले.

Startup conclave 2022 : ‘स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2022’ उत्साहात संपन्न

कार्यक्रमाचे स्वागत विज्ञान विभाग प्रमुख रोहित नागलगाव यांनी केले. यावेळी जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचा उद्देश सर्वांना पटवून दिला.(World food day) इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना अन्न सुरक्षेसारखा प्रश्न गंभीर आहे व प्रत्येकाला पोटभर अन्न मिळण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले व तसेच सर्वांनी अन्नाची नासाडी करू नये यासाठी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. नेहा जोशी व कु. आयेशा मुल्ला यांनी केले व आभारप्रदर्शन कु. ऋतूजा सोनवणे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापिका सौ. ऐश्वर्या शेवकर यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.