Lonavala News : राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेला लोणावळ्यात आजपासून सुरुवात

एमपीसी न्यूज  : हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य नामांकन शिवसेना परिवार लोणावळा शहर शिवजयंती उत्सव खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले. (Lonavala News) यावेळी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करत फित कापून स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही कॅरम खेळण्याचा आनंद घेतला व कॅरम खेळाला ऑल्मपिक स्पर्धेत स्थान मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Pimpri News : रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

याप्रसंगी शिवसेना माजी पुणे जिल्हा प्रमुख व पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, भारत देसडला (कॅरम असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष), अरुण केदार (महाराष्ट्र कॅरम उपाध्यक्ष), नंदू सोनवणे (सचिव), प्राची जोशी (खजिनदार), सुदाम दाभाडे (सहखजिनदार), रावसाहेब कानावडे (सहसेक्रेटरी), निरंजन जहागिरदार (सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह शिवसेनेचे ज्ञानदेव जांभुळकर, मारुती खोले, संजय घोंगे, महेश खराडे, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, विशाल पाठारे, इंद्रजीत तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.