Chinchwad News: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सगळ्यांना पटेल अशी भाषा वापरायला हवी होती – विरोधीपक्ष नेते अजित पवार

एमपीसी न्यूज: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सगळ्यांना पटेल अशी भाषा वापरायला हवी होती असे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज संध्याकाळी मत व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने आज एक दिवसीय शिबीर चिंचवड मधील आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीर संपल्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली.

पवार म्हणाले की विचारांची लढाई विचाराने केली पाहिजे. त्यामध्ये दुमत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु हे वैचारिक मतभेद मांडत असताना आपल्याला जी आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आपली भाषेचा विचार करून सगळ्यांना पचेल पटेल अशी भाषा वापरावी.

Pimpri News: “शाईफेक” प्रकरण पिंपरी-चिंचवडच्या लौकिकाला गालबोट! – महेश लांडगे यांची टीका

पाटील यांनी भीक हा शब्द न वापरता पर्यायी शब्दांचा वापर करायला हवा होता. लोकवर्गणी मागितली, मदत मागितली, लोकसहभाग मागितला असे कितीतरी शब्द आहेत ते म्हणता आले असते. पण तुम्ही भीक मागितली असा शब्द वापरला.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वर वक्तव्य केल्याने काल समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. मात्र राजकीय दबावामुळे त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जो चुकीचा आहे.

यापूर्वी पवार आपल्या भाषणात सरकारच्या कामकाजावर टीका करताना म्हणाले की, राज्यात लंपी आजार पसरत आहे. हजारो गाई मेल्या. सरकारचे लंपी आजाराकडे लक्ष नाही. गोवरची साथ आली आहे. सरकार ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री फक्त त्यांचे 40 आमदार सांभाळण्यात व्यस्त आहेत. हे खोके सरकार आहे. हे स्थगिती सरकार आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर न घालणारे सरकार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.