Road Safety Cricket Cup: रेजिंग लायन्स ठरला रोड सेफ्टी क्रिकेट चषकाचा मानकरी

एमपीसी न्यूज: बोर्ड फॉर वेटरन क्रिकेट इन इंडिया, (क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली) यांच्या तर्फे भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट द्वारे रस्ता सुरक्षा आणि खबरदारीविषयी जनजागृती तसेच सामाजिक संदेश देणारा ‘रस्ता सुरक्षा क्रिकेट चषक’ (Road Safety Cricket Cup) हा एक दिवसीय उपक्रम शिवाजीनगर पोलिस ग्राउंड येथे पार पडला.

बिविसिआयचे अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनांतर्गत बिविसिआयचे चेअरमन मिहिर कुलकर्णी यांनी या क्रिकेट चषक चे आयोजन केले होते. मिहीर कुलकर्णी यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमास अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे, विक्रम कुमार, पुणे महा नगर पालिका आयुक्त, राहुल चव्हाण, सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

Chinchawad news: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ

रेजिंग लायन्स (पुणे पोलिस) टीमचे कप्तान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि स्काय हॉक्स (पुणे, मनपा) टीम चे कप्तान महा नगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघातील सामना चांगलाच रंगला. सामन्याचा टॉस रेजिंग लायन्सने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना सात आणि चार षटकांची फलंदाजी करण्याची संधी मिळाली. रेजिंग लायन्सने पहिल्या डावाच्या सात षटकात प्रथम फलंदाजी करताना ९५ धावा केल्या.

तर प्रत्युत्तरात स्काय हॉक्सचा डाव ४६ धावात आटोपला. दुसऱ्या डावात रेजिंग लायन्सने चार षटकात ३९ धावा केल्या तर स्काय हॉक्स चा संघ ४९ धावाच करू शकला आणि रेजिंग लायन्स नी हा सामना ३९ धावांनी जिंकून बाजी मारली तर स्काय हॉक्स संघ उपविजेता ठरला. सर्वोत्तम गोलंदाजाचा मान स्काय हॉक्स च्या संदीप पाटोळे यांना मिळाला तर रेजिंग लायन्स चे विशाल मोरे सर्वोत्तम फलंदाज आणि सामन्याचे मानकरी ठरले. विजेता आणि उप विजेता संघास मान्यवरांच्या हस्ते चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडूस विजयचिन्ह देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.