Road Safety Cricket Cup: क्रिकेटद्वारे रस्ता सुरक्षा आणि खबरदारीविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज : शहरी आणि ग्रामीण भागात नेहमीच वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त केले जाते परंतू अनेक वाहनचालक नियम पाळत नाहीत तसेच अनेक वाहनचालकांना अजूनही वाहतुकीच्या अनेक नियमांची माहिती नाही. रस्त्यावरील बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्याच निष्काळजीपणामुळे होत असून त्यामुळे त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात आल्याचे अनेकदा दिसून येते.

नुकतीच घडलेली घटना म्हणजे दिवंगत सायरस मिस्त्री, जे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष होते, यांच्या अपघाती निधनानंतर, रस्ते अपघात आणि सुरक्षिततेबाबत ठोस पाऊल उचलण्याची गरज ओळखून शासनाची मान्यताप्राप्त संस्था बोर्ड फॉर वेटरन क्रिकेट इन इंडिया, (क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली) यांच्या तर्फे भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट द्वारे रस्ता सुरक्षा आणि खबरदारीविषयी जनजागृती तसेच सामाजिक संदेश देणारा ‘रस्ता सुरक्षा क्रिकेट चषक’ हा एक दिवसीय उपक्रम येत्या ११ डिसेंबर रोजी शिवाजी नगर पोलिस ग्राउंड येथे संस्थेचे मुख्य अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनांतर्गत आयोजित करण्यात आल्याची घोषणा संस्थेचे युवा अध्यक्ष मिहिर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली.

Suryadatta Education Foundation: सुषमा चोरडिया यांना ‘वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट आयकॉन इन एशिया’ पुरस्कार

मिहीर कुलकर्णी यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रातील सरकारी अधिकारी एकत्र येत आहेत. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे, विक्रम कुमार, पुणे महा नगर पालिका आयुक्त, राहुल चव्हाण, सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा क्रिकेट चषक मधे उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० दरम्यान रेजिंग लायन्स (पुणे पोलिस) आणि स्काय हॉक्स (पुणे, मनपा) या दोन संघा मधे क्रिकेट सामना रंगणार असून जनतेस पाहण्यास खुला असणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. सामन्या नंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा पार पडणार असून विजयी संघास चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडूस विजयचिन्ह देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.