Suryadatta Education Foundation: सुषमा चोरडिया यांना ‘वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट आयकॉन इन एशिया’ पुरस्कार

एमपीसी न्यूज : महिला सक्षमीकरण, बालकल्याण व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या (Suryadatta Education Foundation) उपाध्यक्षा सुषमा एस. चोरडिया यांना ‘वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट आयकॉन इन एशिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि एज्युकेशन पोस्ट यांच्यातर्फे नुकत्याच गोवा येथे आयोजिलेल्या चौथ्या एशिया पॅसिफिक एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘उच्च शिक्षणातील भविष्यवेधी तंत्रज्ञान: एनईपी दृष्टीकोन’ अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना होती.

या परिषदेला जगभरातील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांचे कुलपती, कुलगुरू यांच्यासह शिक्षणतज्ञ सहभागी झाले होते. सर्व स्तरावर दर्जेदार शिक्षण कसे उपलब्ध करून देता येईल, याबाबत या परिषदेत चर्चा झाली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षणतज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला. सुषमा चोरडिया यांना महिला व बालकल्याण क्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले.

Talegaon News : तळेगावात हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक

एक प्रख्यात परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या चोरडिया समाजाच्या भल्यासाठी आणि दीनांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट अंतर्गत विविध स्वयंसेवी कौशल्य आधारित प्रकल्प, जागरूकता कार्यक्रम आणि समाजातील गरजू, पात्र, आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाला मोफत शिक्षण देण्यात येते.

सूर्यदत्त ग्रुपने सुरू केलेल्या विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. गावातील महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप, मुलांना मोफत कपडे आणि सकस आहाराचे वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे आदी उपक्रमांचा समावेश आहे. श्रीमती चोरडिया या ग्रुपचा मातृ चेहरा आहे आणि ‘सूर्यदत्त’मधील महिला शिक्षक सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.