Pune: संध्या’ मैफलीत संतूर, तबला व बासरीचा त्रिवेणी संगम

एमपीसी न्यूज : संतूर आणि तबलावादनाची मनोहारी (Pune) जुगलबंदी… या जुगलबंदीला सुमधुर स्वरांच्या बासरीची मिळालेली साथ… संतूर, तबला आणि बासरी यांच्या त्रिवेणी संगमाने ‘सुरेल संध्या’ मैफल रंगली.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी खास ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव 23-24’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक शंतनू गोखले, तबलावादक अजिंक्य जोशी आणि बासरीवादक एस. आकाश या तिघांच्या बहारदार वादनातून साकार झालेल्या ‘सुरेल संध्या’ कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शंतनू गोखले आणि अजिंक्य जोशी यांची संतूर व तबला जुगलबंदी मनाला भुरळ घलणारी होती, तर एस. आकाश यांनी सुमधुर बासरीवादनातून रसिकांना कृष्णदर्शन घडवले. या संगीतरम्य संध्याकाळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर सुरमयी भाव प्रकटताना दिसत होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते तीनही कलाकारांचा ‘सूर्यदत्त सूर्यभारत सन्मान 2023’ देऊन गौरव करण्यात आला. सुवर्णपदक, फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले खास स्कार्फ, पुस्तक, सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्परूप होते.

Pune : प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या समस्यांची हेमंत रासने यांनी केली पाहणी

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्यात ऑल ‘सूर्यदत्त’च्या सल्लागार मंडळाचे सदस्य प्रसन्न पाटील, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रीती काळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे नीलकंठ बजाज, प्रसिद्ध निवेदक किशन शर्मा, ‘सूर्यदत्त’चे कार्यकारी संचालक अक्षित कुशल,सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य किरण राव, सूर्यदत्त पब्लिक (Pune) स्कुलच्या मुख्याध्यापिका वंदना पांडे, प्रा. अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आजच्या या सुरेल मैफलीने आपल्या सर्वांची सायंकाळ आनंदमय व स्वरमय झाली. नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित सुरेल कार्यक्रमातून तिघांनीही बहारदार वादन केले. सांगीतिक कार्यक्रमातून आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असते. कलेला प्रोत्साहन देण्याची, कलेचा आदर करण्याची संस्कृती सूर्यदत्तने सुरवातीपासूनच जोपासली आहे.”

शंतनू गोखले म्हणाले, “प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेमामुळे आपल्या सर्वांसमोर वादन करण्याची संधी मिळाली. पहिल्या भेटीत चोरडिया यांनी आमच्या वादनाचा कार्यक्रम सूर्यदत्तमध्ये आयोजित करण्याचे वचन दिले होते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दिलेले हे वचन त्यांनी आज पूर्ण केले आहे.” सूत्रसंचालन प्रशांत पितलिया यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.