Bhosari : चोरलेल्या भंगाराची वाहतूक करण्यासाठी त्यांनी चोरल्या चार रिक्षा

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. हे चोरटे रिक्षा चोरून त्यातून चोरीचे भंगार साहित्य वाहून नेत. (Bhosari) त्यानंतर रिक्षा सोडून देत असत. तिघांकडून चार रिक्षा आणि एक दुचाकी असा सात लाख 70 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आर्यन प्रमोद भालेराव, सुमित भीम सूर्यवंशी (दोघे रा. दापोडी), रिजवान रमजान मुलाणी (रा. चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात रिक्षा चोरीचे गुन्हे घडू लागल्याने त्याबाबत दोन पथके तयार करण्यात आली. त्यातील एका पथकाला एका रिक्षातून दोघेजण संशयितपणे जाताना आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रिक्षा थांबवण्यास सांगितले असता दोघेजण रिक्षा घेऊन पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून आर्यन आणि सुमित या दोघांना रिक्षासह ताब्यात घेतले.(Bhosari) त्यांच्याकडील रिक्षा चोरीची असल्याचे तपासात उघड झाले. त्या दोघांनी त्यांचा तिसरा साथीदार रिजवान याच्यासोबत मिळून आणखी रिक्षा चोरल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रिजवान याला देखील एका रिक्षासह अटक केली. तिघांकडून चार रिक्षा आणि एक दुचाकी असा एकूण सात लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune : पुण्यातील भूमकर पुलावर टँकरचा अपघात

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, प्रतिभा मुळे, आशिष गोपी, संतोष महाडिक, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सचिन सातपुते, सागर जाधव यांच्या पथकाने केली.

चोरीची रिक्षा चोरीच्या सामान वाहतुकीसाठी

आरोपी प्रथम रिक्षा चोरी करत. त्यानंतर शहरातील विविध भागात सुरु असलेल्या बांधकाम साईट, मेट्रो साईटवरून भंगार साहित्य चोरी करत. (Bhosari) चोरी केलेले भंगार साहित्य रिक्षात घालून ते विक्रीसाठी नेईपर्यंत रिक्षा वापरायची. त्यानंतर रिक्षा कुठेही सोडून द्यायची, अशा प्रकारे आरोपी गुन्हे करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.