Pune : भूमकर पुलावर टँकरचा अपघात, रस्त्यावर वाहू लागले खोबरेल तेलाचे पाट

एमपीसी न्यूज :  पुण्यातील भूमकर पुलावर खोबऱ्याचे तेल घेऊन (Pune) जात असलेल्या टँकरचा अपघात झाला आहे. टँकर चे गिअर तुटल्यामुळे तसेच ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. खोबरेल तेलाची वाहतूक करणारा हा टँकर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. भूमकर पुलावर येताच टँकर पलटला. ही घटना सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु रस्त्यावर खोबरेल तेल मोठ्या प्रमाणात सांडल्याने महामार्ग निसरडा झाला आहे.

MPC News Special : रखरखत्या उन्हात हलगर्जीपणा केल्यास होऊ शकतो ‘उष्माघात’

रस्त्यावरून वाहने घसरत असून महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाहतूक संत गतीने पुढे जात आहे. घटनास्थळी सिंहगड पोलीस सिंहगड वाहतूक विभाग तसेच मनपा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

 

अपघातग्रस्त टँकर तामिळनाडूतील कोईमतूर येथून जवळपास 24,000 हजार लिटर खोबरेल तेल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. नऱ्हे येथील भूमकर पुलावर गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकर चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.(Pune) रस्त्यावरून तेलाचे पाट वहात असल्याने महामार्ग निसरडा झाला आहे.  त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने सिंहगड वाहतूक विभाग व सिंहगड पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.