Pune : शिक्षणाची ओढ अन् अग्निशमन जवानाची दहावीत समाधानकारक कामगिरी

एमपीसी  न्यूज – शिक्षणाची ओढ व इच्छाशक्ती असली की स्वस्थ न बसता त्या दिशेला जाण्याचा मार्ग अवगत होतोच हे पुणे अग्निशमन दलात कर्तव्य बजावणारे जवान राजेश गणपत घडशी यांनी (वय वर्षे ३७) यंदाच्या वर्षी दहावीमधे ४४% गुण मिळवित यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी त्यांचे कौतुक करत दलासाठी ही बाब अभिमानास्पदच असल्याचे म्हटले आहे. 

जवान घडशी हे मुळ कोकण येथे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नजीक घडशी गावातील रहिवाशी. वडील अग्निशमन दलातून सेवानिवृत्त असून जवान घडशी यांनी वीस वर्षापुर्वी घरातील बेताची परिस्थितीमुळे दहावीच्या आधीच शाळा सोडली व किरकोळ स्वरुपात पुण्यात जमेल तसे काम करत घराला हातभार लावला. अखेर २००७ साली त्यांची अग्निशमन दलाकडे फायरमन या पदावर नियुक्ती झाली.  त्यांना दहावी उत्तीर्ण व्हायच ही ओढ स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी शिक्षण सोडल्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर ज्ञान प्रसारक विद्या मंदिर, आंबेगाव पठार येथे गतवर्षी प्रवेश घेतला. बिबवेवाडी येथे जवान घडशी सध्या स्थायिक असताना त्यांनी अप्पर येथे बेसके सर यांच्याकडे शिकवणी घेत घरी व कामावर अभ्यास करत दहावीत यश संपादन केले.

जवान घडशी म्हणाले, “इच्छेप्रमाणे दहावी उत्तीर्ण झालो व त्याचे समाधान आहे. कारण कष्टाचे फळ उत्तमच मिळाले. पुढे आता अजून शिक्षण घेत पदवी मिळवण्याचे स्वप्न आहे. ते ही मी पुर्ण करेन.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.