Bhosari : विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे!

एमपीसी न्यूज : – स्पर्धात्मक जीवनात विद्यार्थ्यांना करिअर आणि कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी विविध संधीबाबत सर्वसमावेश माहिती ज्ञान करावी आणि यशस्वीपणे वाटचाल करावी, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.

Pimpri : दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम

भोसरी (Bhosari) येथे कै. अंकुशराव लांडगे सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकाराने व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी या शिबिराच्या आयोजनामागचा शिंदे-फडणवीस सरकारचा उद्देश स्पष्ट केला. सरकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळण्यासाठी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास आयआयबी संस्थेचे महेश लोहारे, ॲड. निता लोहारे, वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशिनचे मनुष्यबळ विभागप्रमुख शिवाजी चौंडकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य शशिकांत साबळे व डी.एन. गरदडे यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी निखील काळकुटे, ऋषभ खरात यांनी सक्रिय पुढाकार घेतला आणि अचूक नियोजन केले. सूत्रसंचालन आयटीआय पिंपरी-चिंचवडचे संतोष गुरव व दिगंबर ढोकळे यांनी केले.

युवकांना सुदृढ व सक्षम बनण्याचे आवाहन.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप कदम यांनी करिअरची व्याख्या समजावून देताना, ज्या क्षेत्रात तुम्हाला तुमचे सर्वोच्च योगदान देता येईल, असे तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा व त्यात स्वतःची ओळख निर्माण करणे हेच करिअर…असा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांना विविध सरकारी शिष्यवृत्ती, कर्ज योजना या विषयी कौशल्य विकासचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी एच. आर. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कुंदन लांडगे यांनी विद्यार्थ्यांना संरक्षण विषयक करिअरची माहिती दिली. युवकांना सदृढ व सक्षम बनण्याचे आवाहन केले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share