Chinchwad : संत साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (Chinchwad) प्रथमच आयोजित होणाऱ्या संत साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी निगडी-प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे हे संमेलन होणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, महान साधू श्री मोरया गोसावी व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमच संत साहित्य संमेलन होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या उभारणीची संकल्पना आमदार महेश लांडगे यांनी प्रत्यक्षात आणली. यानिमित्ताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांनी निवड करण्यात आली आहे.
नियोजन समितीच्या शर्मिला महाजन म्हणाल्या की, संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्य शिरोमणी गुरूदेव शंकर अभ्यंकर, उद्घाटक माजी नगरसेवक अमित गावडे आहेत. तसेच, समारोपाच्या सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार अण्णा बनसोडे उपस्थित असणार आहेत.समर्थ भक्त समीर लिमये, संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे, राम कथाकार रवी पाठक, निरुपणकार व निवेदिका अनघा मोडक, परमपुज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांचे विचार ऐकरण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
अनुष्का स्त्रीमंच, ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी-चिंचवड, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ व्यासपीठ, शब्दरंग कला साहित्य कट्टा, रसिक साहित्य मंडळ, गौड ब्राह्मण समाज, ब्राह्मण जागृती सेवा संघ अशा विविध संस्था, संघटनांनी संमेलनाच्या (Chinchwad) आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे.
Maval : छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक – विवेक गुरव
किशन महाराज महाराज चौधरी यांना जीवनगौर-
या संमेलनामध्ये आपण किशन महाराज चौधरी यांना ‘‘संत साहित्य अभ्यासक जीवनगौरव पुरस्कार’’ देणार आहोत. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड मधल्या दहा ज्येष्ठ संत साहित्य अभ्यासक यांचाही विठ्ठलाची मूर्ती देऊन गौरव होणार आहे. संत साहित्याच्या पुस्तकांचे एक खास दालन इथे उभारण्यात येणार आहे. ग्रंथ दिंडी, लेझीम, ढोल पथक यांनी कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि पसायदान व पदन्यास करून संमेलनाची सांगता होणार आहे.