Maval : छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक – विवेक गुरव

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बालवयातच ( Maval) मुलांपर्यंत पोहोचवावा. महाराजांचे संघटन कौशल्य, त्यांना मिळालेली शिकवण, संस्कार यातून आपली मुले घडतील. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा किमान एक गुण अंगीकारणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांनी व्यक्त केले. वारंगवाडी मावळ येथील कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

या कार्यक्रमाला भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक सोमनाथ गव्हाणे, बाळासाहेब तुमकर, हभप रमेश खोंडगे,हभप तुकाराम धुमाळ,रामनाथ धुमाळ,राम वारिंगे,सिताराम धुमाळ,दिलीप नखाते, विनोद थोरवे,सुनिल नखाते,रोहित वारिंगे,अजय नखाते,ऋषिकेश वारिंगे, नितीन वारिंगे,अनिल वारिंगे (पाटील), मृदंगमणी दत्ता कारके आदी यावेळी उपस्थित होते.

 

वारंगवाडी मावळ येथील कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत आयुष वारींगे व देवांश नखाते यांनी पहिला क्रमांक पटकाविला.विजेत्यांना रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन ( Maval) गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस

वितरणासाठी राज्य पुरस्कार विजेते व प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह जाणार प्रशिक्षणाला; प्रदीप जांभळे यांच्याकडे आयुक्तपदाचा चार्ज

 

कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आंबी ग्रामपंचायतीचे सदस्य विक्रम प्रकाश कलावडे यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने गड किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 43 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.एकूण चार क्रमांक ठेवण्यात आले होते. चार क्रमांकांना अनुक्रमे रोख 7000/रूपये, 5000/रूपये,3000/-रूपये व 2000/- रूपये ठेवण्यात आली होती. स्पर्धेत मुलांनी अतिशय उत्तम पद्धतीने गडकिल्ले बनविले, गडकिल्ल्यांबद्दल माहिती व स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक दिली त्यामुळे चार क्रमांक आठ मुलांना विभागून देण्यात आले.

 

त्यामध्ये प्रथम क्रमांक- आयुष नितीन वारिंगे व देवांश दिलीप नखाते, द्वितीय क्रमांक- आदित्य मंगेश नखाते व राज भास्कर वारींगे, तृतीय क्रमांक- शिवराज महेंद्र वारींगे व हर्षवर्धन सोमनाथ गव्हाणे, चतुर्थ क्रमांक-  श्रद्धा विकास वारींगे व मयुरेश देविदास तुमकर आदींना प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव सर, कार्यक्रमाचे आयोजक विक्रम कलवडे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम व ट्राॅफी देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.

 

व्याख्याते गुरव म्हणाले की, छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास बालवयात मुलांना रुजविण्याची गरज आहे, आपल्या ( Maval) संस्कृतीत दिपावली सण मोठा साजरा करण्यात येतो. बालवयात शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य, जिजाऊ मातेने दिलेले संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य प्राप्त केले म्हणून मुलांनो इतिहासाची पुस्तके वाचा व माझ्या शिवाजी महाराजाचा एक गुण अंगी कारला तर आपल्या जीवनात आपण नक्कीच यशस्वी होऊ असे ही गुरव यांनी सांगितले.

विक्रम कलावडे म्हणाले की, किल्ले बनवा स्पर्धेमुळे मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेता येतो आणि इतिहास समजतो मुलांमधील कला, समजुती,गुण आणि मुलांना व्यासपीठ निर्माण होते.
कार्यक्रमाचे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन वारिंगे,उपाध्यक्ष  दत्तात्रय शिंदे,ॠषिकेश वारिंगे,धनंजय काकडे आदींनी केले.प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक विक्रम कलावडे यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक दत्तात्रय वारिंगे यांनी केले तर आभार नितीन नखाते ( Maval) यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.