Subhedar 2023 – ‘ सुभेदार ‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

एमपीसी न्यूज – दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘ सुभेदार ‘ याचा ट्रेलर   ( Subhedar 2023 )सोमवारी युट्युब वर प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी हे प्रमुख भूमिकेत दिसत असून अजय पुरकर हे तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत.

चित्रपट हा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटाची बरेच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. आपण सर्वजण तानाजी मालुसरे यांच्या सिंहगड किल्ल्याबाबतच्या शौर्यगाथा जाणतोच परंतु हा चित्रपट आपल्याला नवा अनुभव देईल आणि सुभेदारांची कथा नव्यादृष्टिकोनातून दाखवेल असे आश्वासन निर्मात्यानी दिले आहे.

Hari Narke : परखड विचारवंत हरी नरके काळाच्या पडद्याआड

चित्रपट रसिक हे या चित्रपटाच्या संगीत व प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने उत्सुक झालेले आहेत. 2020 मध्ये आलेल्या ‘ तान्हाजी ‘ चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांनी ऐतिहासिक गोष्टींना घेऊन काही प्रश्न उठवले होते. परंतु फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, या चित्रपटांमध्ये दाखवलेल्या अचूक इतिहासामुळे या चित्रपटाची ‘ क्रेझ ‘ झाली आहे.

सुभेदार 18 ऑगस्टला रिलीज होत असून, या चित्रपटाचा सामना बॉक्सऑफिसवर ओएमजी 2 आणि गदर 2 बरोबर होईल असे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये सिनेफाईल्सवर चित्रपटांची  ( Subhedar 2023 ) मेजवानीच आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.