Pune News – ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ चे रविवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज – विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात होणार आहे. दीपाली पाटवदकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लेखक -समीक्षक सौ. शेफाली वैद्य, अभिजित जोग तसेच साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांच्याहस्ते हे प्रकाशन होणार आहे. रविवार, १८ जून २०२३ रोजी,सायंकाळी सहा वाजता स्वा. सावरकर अध्यासन केंद्र ( कर्वे रस्ता ) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

Pune News – अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

देव, धर्म, भाषा, शब्द, लिपी, ग्रंथ, कथा, काव्य, पंचांग, गणित, विज्ञान, कला या क्षेत्राद्वारे जी भारतीय संस्कृती देशविदेशात पोचली, तिथल्या मूळ संस्कृतीशी एकजीव झाली, तिचा मनोवेधक प्रवास ” स्वस्तिचिन्हे ” या ग्रंथातून लेखिकेने घेतला आहे. रामकथेच्या अशाच वाटचालीवरच्या रामकथामाला या ग्रंथानंतरचे लेखिकेचे हे नवे पुस्तक आहे..

कंबोडियाच्या ध्वजावर विष्णूचे मंदिर, थायलंडच्या राज्याच्या झेंड्यावर ऐरावत, इंडोनेशियामधील विद्यापीठांच्या लोगोवर गणपती, आग्नेय आशियाई देशांच्या समुद्री स्पर्धेचे चिन्ह समुद्रस्नान करणारा हनुमान,आशियाई तिरंदाजी खेळांचे चिन्ह धनुर्धारी राम, पांडव वंशातील मातेच्या पोटी घटोत्कचाचा पुनर्जन्म आणि त्याचा बदला घेण्यासाठी आलेला चिरंजीव अश्वत्थामा यांची कहाणी सांगणारा इंडोनेशियाचा 2021 चा चित्रपट ” क्षत्रिय देव घटोत्कच अशा अनेक गोष्टींचा या पुस्तकात समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.