Talavade : ग्राइडिंग मशिनमधील स्पार्क थिनरच्या डब्यावर पडल्याने कंपनीला आग

एमपीसी न्यूज – ग्राइडिंग मशिनमध्ये (Talavade ) स्पार्क होऊन त्याची ठिणगी थिनरवर पडून कंपनीला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी शेलारवस्ती, तळवडे येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणे दहा वाजता महेंद्र सगळगिळे यांनी आगीबाबत वर्दी दिली. शेलारवस्ती, तळवडे येथील तेजस सेंट्रींग ऍन्ड कन्स्ट्रक्‍शन इक्‍विपमेंट प्रा.लि. या कंपनीत ग्राइडिंग मशीनवर काम सुरू होते. त्यावेळी त्याची ठिणगी थिनरवर पडली.

MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

थिनर हे अति ज्वलनशील रसायन असल्याने क्षणार्धात आग भडकली. आगीची माहिती मिळताच तळवडे, चिखली, अग्निशामक मुख्यालय व मोशी येथील प्रत्येकी एक बंब (Talavade) घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीत थिनरचा साठा असल्याने आगीत कंपनीतील संगणक, फ्रीज, लॅपटॉप, थिनर व इतर साहित्य जळून खाक झाली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.