Talegaon Crime : गहुंजे येथे 45 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – गहुंजे येथे अज्ञात चोरट्यांनी एका घरात घरफोडी करून 45 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेनऊ वाजता गहुंजे येथील फायर स्टेशनच्या बाजूला उघडकीस आली.

संदीप बाबुराव पवार (वय 36, रा. फायर स्टेशनच्या बाजूला, गहुंजे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 7) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांच्या घराच्या मेनगेटचे साखळी आणि कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून एलसीडी टीव्ही, हार्ड डिस्क, मनगटी घड्याळ, दोन स्मार्ट वॉच आणि मोपेड दुचाकी (एम एच 14 / सी आर 3702) असा 45 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.