Pimpri Corona Update : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 123 रुग्ण; 101 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 8) 123 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 88 हजार 802 झाली आहे.

दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नसून 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 830 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी 101 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 85 हजार 475 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील एकाही रुग्णाचे आज शहरात निदान झाले नाही. सध्या 167 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील 951 रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 413 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.