Talegaon Crime News : तळेगाव खिंडीत अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव खिंडीत आणखी एक अपघाताचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 5 ऑगस्ट रोजी दुपारी पुणे मार्गावर घडला.

तनजीम मोहम्मद खान (वय 59, रा. सेनापती चौक, दापोडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत मुबारक तनजीम खान (वय 23) यांनी बुधवारी (दि. 1) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील तनजीम खान 5 ऑगस्ट रोजी त्यांचे तळेगाव येथील नातेवाईक जावेद खान यांना भेटण्यासाठी गेले होते. जावेद खान यांना भेटून परत दापोडी येथील घरी येत असताना तळेगाव खिंडीत दर्ग्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक ए एस हिवरकर तपास करीत आहेत.

17 ऑगस्ट रोजी याच ठिकाणी प्राणांतिक अपघात झाला होता. भरधाव वेगात जाणाऱ्या  डंपरने एका पादचारी व्यक्तिला चिरडले होते. हे ठिकाण अपघाताचा हॉटस्पॉट ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.