Pimpri News: पीसीएमटीचे 124 कर्मचारी महापालिका आस्थापनेवर कायम; PMPML संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या पीसीएमटी मधील 124 कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्यात आले. पीएमीएमएल संचालक मंडळाच्या आज (गुरुवारी) पुण्यात झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील 124 कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायमस्वरुपी आस्थापनेवर घेण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील पूर्वीच्या पीसीएमटीतील 124 कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी वर्ग करण्यास तसेच हे कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या असणाऱ्या सर्व देय रकमा ग्रॅच्युटी, रजावतेन, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी रकमा पीएमपीएमएलला प्राप्त होणा-या संचलन तुटीतून अदा करणेस अखेर मान्यता मिळाल्याचे महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीत असणारी पीसीएमटी आणि पिंपरी पुणे महापालिकेच्या अखत्यारीत असणारी पीएमटी या दोन्ही परिवहन संस्थांचे 15 डिसेंबर 2007 ला पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) मध्ये विलिनीकरण करण्यात आले. यानंतर पीएमपीची संचलन तूट म्हणून पुणे महापालिका 60 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 40 टक्के याप्रमाणे रक्कम देतात. त्यामुळे या सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेगळी तरतूद करावी लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.