Pimpri Corona Update: शहरात आज 200 नवीन रुग्णांची नोंद, 132 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 200 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 132 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजमितीला शहरात 1 हजार 428 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 400 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 69 हजार 958 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 428 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 819 रुग्ण गृहविलगीकरणात असून 609 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 46 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 412 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 565 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 14 लाख 80 हजार 69 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.