Mumbai News : बिग बॉस 13 चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट

एमपीसी न्यूज – बिग बॉसच्या 13व्या सिझनचा विजेता आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं अकाली निधन झालं. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या जाण्याने त्याचे चाहते आणि सिनेसृष्टी दुःख व्यक्त करत आहे.

सिद्धार्थचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. शवविच्छेदनात व्हिसेरा राखून ठेवला जाणार असून त्याची तपासणी केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल.

खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रियालिटी शो मधून तो झळकला होता. हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या मृत्यूने सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.