Talegaon Crime News : मुलीला दागिने देण्यासाठी सुनेकडे पैशांची मागणी

एमपीसी न्यूज – मुलीला दागिने देण्यासाठी तसेच पुण्यामध्ये नवीन घर घेण्यासाठी सासरच्या लोकांनी सुनेकडे पैशांची मागणी केली. सुनेचा वेगवेगळ्या कारणांवरून शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार 17 डिसेंबर 2015 ते 28 जुलै 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

पती योगेश नारायण साबळे, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने शनिवारी (दि. 2) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहित महिला सासरी नांदत असताना त्यांचे पती, सासू आणि नणंद यांनी घरगुती किरकोळ कारणावरून ‘तुला स्वयंपाक येत नाही. तुला घरातील कामे येत नाही’, असे घालून पाडून बोलून अपमानास्पद वागणूक दिली. पुण्यामध्ये नवीन घर घेण्यासाठी व फिर्यादी यांच्या नणंदेला सोन्याचे दागिने देण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे घेऊन येण्याची वारंवार मागणी केली. वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी केली. आरोपी पतीने फिर्यादी यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.