Talegaon Crime News : मेडिकल फोडून 33 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे गावातील शिवाजी चौक ते वराळे रोडवर असलेले मेडिकल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले. दुकानातून 33 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 28) पहाटे उघडकीस आली.

अमृता योगश खोतकर (वय 34, रा. तळेगाव दाभाडे. ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे गावातील शिवाजी चौक ते वराळे रोडवर अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. 27) रात्री नऊ वाजता फिर्यादी यांनी त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केला. रात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून पोर्टेबल डीव्हीडी आणि रोख रक्कम असा एकूण 33 हजार 740 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शनिवारी पहाटे पावणे चार वाजता उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.