Talegaon Dabhade : वयाची साठी उलटलेले वर्गमित्र 48 वर्षानंतर एकत्र

एमपीसी न्यूज – नूतन विद्या मंदिर सध्याची ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या (Talegaon Dabhade) शाळेतील सन 1974-75 साली अकरावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी तब्बल 48 वर्षानंतर एकत्र आले. निमित्त होते वर्गमित्राचा वाढदिवस. यानिमित्त एकत्र येऊन वर्गमित्रांनी अनोखा उपक्रम राबविला. उद्योगधाम संस्था आणि मायमर रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदत करत वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी आणि आई वडिलांचा वारसा जपत विनयचंद्र दिघे यांनी देहदानाचा अर्ज भरला. हे विद्यार्थी या वयातही दरवर्षी विविध उपक्रम राबवित असल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

सन 1974-75 या वर्षी इयत्ता अकरावीमध्ये असलेल्या नूतन विद्या मंदिर (सध्याची ॲड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर) या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी विनयचंद्र दिघे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योगधाम येथील संस्थेला रुपये पाच हजारचा धनादेश व तेलाचा डबा उद्योगधाम संस्थेचे विश्वस्त सुरेश झेंड व उर्मिला बासरकर यांना दिला. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मदत व्हावी, या दृष्टीने मायमर रुग्णालयामध्ये रुपये दहा हजाराचा धनादेश संस्थेचे संचालक डॉ. कामत याना देऊन आपल्या सामाजिक बांधिलकीची उतराई केली.

Talegaon Dabhade

मागील वर्षी वयाची साठी पार केलेल्या या ग्रुपमधील विद्यार्थ्यांनी (Talegaon Dabhade) स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या ग्रुपमधील मुकुंद करंदीकर यांचे निधन झाले. त्यांचे स्मृतिप्रित्यर्थ ग्रुपकडून नूतन विद्या मंदिर (सध्याची ॲड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर) मधील इयत्ता दहावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपये कायम रक्कम संस्थेच्या सोसायटीमध्ये जमा केली. व त्या रक्कमेच्या येणाऱ्या व्याजामधून कायमस्वरूपी इ. दहावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्याचे नियोजन केले आहे.

मागील वर्षानंतर आज तागायत ग्रुपमधील ज्या ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होतात. त्या त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करून त्याला प्रोत्साहन दिलं जातं. हा उपक्रम कायम राबवला जात आहे.

Chinchwad : शेजाऱ्याला भांडण करू नका सांगत असताना दुसऱ्या शेजाऱ्याने मारली लाथ; ज्येष्ठ नागरिक जखमी

विनयचंद्र दिघे यांचे आई-वडील यांनी या अगोदर देहदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच विद्यार्थी विनयचंद्र दिघे यांनी या अगोदर नेत्रदानाचा फॉर्म भरला आहेच तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने देहदान करण्याचा फार्म भरून त्यामाध्यमातून आपल्या आई-वडिलांच्या वारसा जपला आहे.

या कार्यक्रमास ग्रुपचे विद्यार्थी पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व सहकार भूषण म्हणून सन्मानित बबनराव भेगडे, पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस अविनाश बवरे, तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, तळेगाव शहर आरपीआयचे माजीअध्यक्ष तानाजी गडकर, सोमाकांत टकले, गोरख बुटे, मधुसूदन खळदे, रमेश डोळे, नंदकुमार कर्णिक, प्रदीप जव्हेरी, सखाराम जगताप, दीपक वाडेकर, तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक मनोहर दाभाडे यांनी केले. धनादेश प्रदान व शुभेच्छा बबनराव भेगडे, अविनाश बवरेसह सर्व उपस्थित मान्यवरांनी केला. सोमाकांत टकले, मधुसूदन खळदे यांनी आभार केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.