Talegaon Dabhade : डी.आर.डी.ओ. प्रकल्पाबाबत लवकरच सरंक्षण राज्यमंत्र्यांसमवेत बैठक- बाळा भेगडे

मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

एमपीसी न्यूज- संरक्षण खात्याने डी.आर.डी.ओ. प्रकल्पासाठी तळेगाव दाभाडे येथील संपादित केलेल्या जमिनीचा तात्काळ मोबदला मिळावा अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या प्रश्नी लवकरच सरंक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या समवेत बैठक बोलावण्यात येणार आहे अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली. मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत बाळा भेगडे यांनी बुधवारी (दि. २६) नवी दिल्ली येथे नितीन गडकरी यांना निवेदन दिले.

डी.आर.डी.ओ. संदर्भात संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्यालयाकडून लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही सांगण्यात आले. तसेच तळेगाव -चाकण रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचे बाळा भेगडे म्हणाले.

मावळ तालुक्यातील कान्हेफाटा-टाकवे ते सावळा रस्यासाठी 35 कोटी रुपये, एकविरा देवी पायथा-कार्ला-भाजे-लोहगड रस्त्यावर इंद्रायणी नदीवर मोठा पूल बांधणे. 10 कोटी रुपये, सोमाटणे-शिवणे-कडधे रस्त्यावर पवना नदीवर मोठा पूल बांधणे. 7 कोटी रुपये, कुरवंडे-खंडाळा-कुणेगाव-उधेवाडी ते राजमाची रस्ता करणे. 7.20 कोटी रुपये. या कामांसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यात यावा, तळेगाव एमआयडीसी करिता ड्राय पोर्ट बांधणे, देहूरोड ते निगडी रस्ता रुंदीकरणासाठी 100 कोटी रुपये व इतर तीन रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.