Talegaon Dahbhade : बाळा भेगडे यांचा लवकरच मोठा पदसत्कार: चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

; तळेगाव दाभाडे शहरातील 12 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज : निवडणुकीतील पराभवाने नाउमेद न होता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पक्षीय राजकारणात गेल्या चार वर्षात दिलेल्या महत्त्वाच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वी केल्या आहेत. पंढरपूर आणि गोवा विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी दोन दोन महिने घरापासून दूर राहून मोलाचे योगदान दिले आहे. त्यात सारिका भेगडे यांची त्यांना मिळालेली साथ मोलाची आहे. मावळसह जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी शासन दरबारी मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल पक्ष लवकरच घेणार असून बाळा भेगडे यांचा भव्य सत्कार लवकरच करणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (11जून) येथे केले.

Nigdi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन

पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या सूतोवाचनंतर भाजपच्या गटात उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण  निर्माण झाले आहे. बाळा भेगडे यांना महत्वाचे महामंडळ किंवा लाल दिव्याचे कोणते पद मिळणार, यावर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत अनेक तर्क लढविण्यात येत आहेत.
तळेगाव दाभाडे (Talegaon Dahbhade) नगरपालिकेच्या हद्दीतील 12 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत शेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष जी.के. भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सारिका भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, ज्योती जाधव, सायली बोत्रे, जितेंद्र बोत्रे, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, आरपीआयचे लक्ष्मण भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.

माझी वसुंधरा स्पर्धेत तळेगाव (Talegaon Dahbhade) नगरपालिकेला  दीड कोटी रुपयांचे पाहिले पारितोषिक मिळाल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मुख्याधिकारी एन. के. पाटील व सहकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाची सोपविलेली जबाबदारी आणि  मावळ तालुक्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पालकमंत्री पाटील यांचे आभार मानले.
यावेळी जी. के. भेगडे, श्रीरंग बारणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे यांचीही भाषणे झाली. शहर अध्यक्ष रवींद्र माने यांनी प्रास्ताविक केले. दिनेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शोभा भेगडे यांनी आभार मानले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना  गतिमान करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लॉबीच्या मक्तेदारीवर नियंत्रण आणून विकासनिधीचे नियोजन विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून करण्याच्या सूचना संबंधीताना दिल्या आहेत. बाळा भेगडे यांच्यावर विकासनिधी नियोजनाची जबाबदारी सोपविली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.