Maval : मावळ लोकसभा भाजप की शिंदे गट लढविणार?, बाळा भेगडे म्हणाले…

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व्हेच्या माध्यमातून भाजपचे काम चालू असून सर्व्हेमध्ये भाजप विजयी होईल असे दिसत असेल तर भाजप त्या ठिकाणी ताकदीने लढेल. मित्र पक्ष विजयी होत असेल तर त्यांच्यासाठी ताकदीने लढू असे भाजपचे समन्वयक, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.

Bjp : रेडझोनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल – बाळा भेगडे

कासारवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भेगडे म्हणाले, मावळ, शिरूरमध्ये सर्व्हेच्या माध्यमातून आमचे काम चालू आहे. ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल. त्याबाबत वरच्या पातळीवर बोललो तर त्या जागा विजयी होणाऱ्या पक्षाला मिळतील आणि आम्ही त्या ठिकाणी निवडणूका लढवू. सर्व्हेमध्ये जी जागा जो पक्ष विजयी होईल असे दिसेल. जर भाजप उमेदवार विजयी होईल असे दिसत असेल तर भाजप त्या ठिकाणी ताकदीने लढेल. मित्र पक्ष विजयी होत असेल तर त्यांच्यासाठी ताकदीने लढू आणि जागा जिंकू,

तर, शिरूरमधून लढण्यासाठी मी 2019 पासूनच इच्छुक असल्याचे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.