Talegaon Dabhade : भगवान महावीर यांचा जन्मवाचन सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन (Talegaon Dabhade) येथे भगवान महावीर यांचा जन्मवाचन सोहळ्यानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यान, अष्टमंगलदर्शन, प्रभूचा पाळणा, अन्नदान अशा उपक्रमांनी हा सोहळा पार पडला.

सकाळी पुज्य मुनि हिरसागरजी म.सा, बाल मुनि वीरभद्र सागरजी म.सा, प्रवचन प्रभावी साध्वीजी नीमवर्षाश्रीजी म.सा, साध्वीजी नेहावर्षाश्रीजी म.सा, साध्वीजी नोतवर्षाश्रीजी म.सा, साध्वीजी भक्तिवर्षाश्रीजी म.सा, साध्वीजी हीवर्षाश्रीजी म.सा. यांच्या सानिध्यात प्रवचन व व्याख्यान पार पडले.

त्यानंतर अष्टमंगल दर्शन अंतर्गत दर्पण, भद्रासन , वर्धमान, श्रीवात्स, मीनयुगल, कलश, स्वस्तीक, नंदावर्त या अष्टमंगलांचे दर्शन सकल संघाला करविण्यात आला.

उपश्रयातानंतर त्रिशला माताला जी चौदा स्वप्ने पडली त्या सप्नांना चैन व हार घालून त्यांचे दर्शन व पूजन करण्यात आले. चौदा स्वप्नांमध्ये हाथी, ऋषभ, कैसरी, सिंह, लक्ष्मी, फुलांची, माळा, चंद्र, सूर्य, ध्वज, कलश, पदसरोवर, रत्नाकर, विमान, रत्नगंजी, अग्नीशिखा यांचा समावेश आहे. त्यानंतर साधू साध्वीजीचे वाचन झाले. वाचनानंतर प्रभूचा पाळणा झाला, यावेळी पाळण्यातील गादीवर प्रभूंना ठेऊन प्रभूंचा पाळणा हलविण्यात आला व पूजा करण्यात आली.

दुपारच्या सत्रात स्वमिवात्सल्य म्हणजेच भोजन करण्यात आले. आजी आजोबांसाठी वानप्रस्थ आश्रम, आभाळमायेचे आश्रम, (Talegaon Dabhade)  आनंदविसावा आश्रम आयोजित करण्यात आले होते.

कुष्टरोगहित मुलामुलींसाठी उद्योगधाम कुष्टरोग पुनर्वसन केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. मुलींसाठी संजीवनी बालीका आश्रम, करुणांजली शाळा हा उपक्रम राबविला. तर गायी म्हशींना बुंदीचे लाडू व शेव गोशाळेच्या माध्यमातून चारण्यात आले.

रात्री मंगलदिवा आरती व जैन भक्तीगीतांच्या गायनाने वातावरण भक्तीमय झाले. अशा विविध उपक्रमांनी भगवान महावीर यांचा जन्म वाचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Mp Shrirang Barne : रसायनीतील हिल इंडिया लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांतीविहार सेवक ग्रुप, जैन सकल संघ, जैन महिला मंडळे, नूतन ट्रस्ट मंडळ या सर्वांनी योगदान दिल्याची माहिती श्री शांतीनाथ आदिनाथ जैन सकल संघातर्फे देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.