Pune : पुणेकरांना उर्दू, हिंदी शेरोशायरीचा आनंद घेण्याची संधी

डॉ. पी. इनामदार युनिव्हर्सिटी, डेक्कन मुस्लिम इस्टीट्युटतर्फे 'ऑल इंडिया मुशायरा'चे आयोजन.

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (Pune) यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘पुणे फेस्टिवल’मध्ये यावर्षी उर्दू, हिंदी शेरोशायरीचा ‘ऑल इंडिया मुशायरा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी’, डेक्कन मुस्लीम इन्स्टीट्यूट’ यांच्या वतीने याचे आयोजन केले असून शुक्रवारी (दि. 22) रात्री साडेआठ वाजता गणेश कला क्रीडा केंद्र येथे हा कार्यक्रम होणार आहे.

डेक्कन मुस्लीम इन्स्टीट्यूटच्या अध्यक्षा आबेदा इनामदार यांनी याबाबत माहिती दिली. पुणे फेस्टिव्हल मधील ‘मुशायरा’ हा कार्यक्रम 1992 पासून सुरु आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमात या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि सलोख्याचे प्रतीक मानले जाते. या (Pune) कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Talegaon Dabhade : भगवान महावीर यांचा जन्मवाचन सोहळा संपन्न

कार्यक्रमात देशातील नामवंत शायर सहभागी होणार आहेत. त्यात डॉ. मंजर भोपाली (भोपाळ), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी), डॉ. कासिम इमाम (मुंबई), फरहान दिल (मालेगाव), अब्दुल हमीद हुनर आणि शाहनवाज काजी सईल आदि सहभाग घेणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.