Talegaon Dabhade : रक्तदान हीच सर्वात मोठी देणगी – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – रक्तदात्यांचा सहभाग पाहून (Talegaon Dabhade) आपली समाजाप्रतीची आदराची भावना लक्षात येते. हे राष्ट्रीय सेवा योजनेचे यश आहे. खऱ्या समाजसेवेची वृत्ती आपल्यात दिसून येते. माझे रक्त घ्या म्हणणारा माणूस मला सर्वात मोठ्या उंचीचा वाटतो, रक्तदान हीच सर्वात मोठी देणगी आहे, असे गौरवउद्गार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी काढले.

इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर तळेगाव दाभाडे लायन्स क्लबचे डॉ. अनिकेत काळोखे, पुणे जिल्हा लायन्स क्लबचे प्रमुख हेमंत अग्रवाल आणि पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे डॉक्टर्स, नर्स व स्टाफ, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लायन हेमंत अग्रवाल यांनी आपली भूमिका मांडताना आपण वयाच्या पन्नास वर्षापर्यंत रक्तदान करू शकतो. वर्षातून चार वेळा (Talegaon Dabhade) रक्त देऊ शकतो. एक रक्तदाता तीन लोकांचे प्राण वाचू शकतो. रक्त दिल्याने पुन्हा ते लगेच निर्माण होते. पुण्यामध्ये प्रसुतीच्या काळात केवळ रक्त न मिळाल्याने दीड लाख महिलांचा मृत्यू होतो.

ते थांबवण्यासाठी आपण रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. आज रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला पाच लाख रुपयांचा विमा आणि प्रमाणपत्र देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

रामदास काकडे पुढे म्हणाले की, “कै. किशोर आवारे यांनी मुंबईचा फ्लॅट विकून कोरोना काळात रुग्णांसाठी केलेले काम अविस्मरणीय आहे. ते कोणीही विसरू शकणार नाही. असे सामाजिक कार्य एनएसएसच्या माध्यमातून होत आहे. आपला तरुण हा भविष्यात नक्कीच गरुड झेप घेईल, याचा मला विश्वास आहे. बाकी सगळ्यांपेक्षा ‘रक्तदान ही सर्वात मोठी देणगी’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

Metro News : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – चंद्रकांत पाटील

बडगुजर यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत असताना रक्त कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही. म्हणून माणसाचीच रक्त माणसाला उपयोगात येतात. आज भारतात दर दोन सेकंदाला एक रक्ताच्या बाटलीची गरज भासत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आज पुण्यात 800 बालकांना महिन्याला प्रत्येकी दोन बाटल्या रक्त चढवावे लागत आहे. एक माणूस 188 वेळा रक्तदान करू (Talegaon Dabhade) शकतो. जोपर्यंत आपण सुदृढ आहोत, तोपर्यंत रक्तदान करण्याचे आव्हान त्यांनी तरुणांना केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनाचे औचित्य साधून इंद्रायणी महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे नमूद केले.

गेल्या वर्षीही दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून रक्तदान केल्याचा उल्लेख करत यावर्षी मुलींनी 200 पेक्षा जास्त नोंदणी केल्याचा उल्लेखही करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सुवर्णा अवचार व कला शाखेतील विद्यार्थिनीनी विद्यापीठ गीत व स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती पेठ यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो समिती सदस्य प्रा डी पी काकडे, प्रा रोहित नागलगाव, प्रा मिलिंद खांदवे, प्रा अर्चना काळे, प्रा सुजाता फडतरे, प्रा डिंपल सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.