Talegaon Dabhade : व्यावसायिकाला मका न देता चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज-  ठरलेल्या व्यवहारानुसार मका न देता (Talegaon Dabhade) व्यावसायिकाचे सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 29 जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथे घडला.

याप्रकरणी डॉक्टर हेमंत कोराट (वय 37 रा तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अभिषेक शर्मा (उज्जैन मध्य प्रदेश)  याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Wakad : 11 वर्षीय मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी याने फिर्यादींना चांदवड येथे त्याचे मका गोडाऊन असल्याचे सांगितले फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.  त्याने गाडीमध्ये मका माल भरून त्याचे वजन पावती देखील फिर्यादींना पाठवली. यासाठी फिर्यादीने आरोपीला चार लाख 1500 रुपये एवढी रक्कम दिली.

मात्र आजतागायात फिर्यादींना मका न देता तसेच स्वतःचा फोन बंद करून त्यांची फसवणूक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Talegaon Dabhade) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.