Talegaon Dabhade : तळेगावातील स्वराज नगरीत स्वामींचा प्रकट दिन  साजरा  

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरी येथे गुरुवारी (दि.23) श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी भक्तांनी (Talegaon Dabhade) स्वामींचा प्रकट दिन अत्यंत भक्ती भावाने आणि एकोप्याने साजरा केला.
रांगोळ्या,दिव्यांची आकर्षक रोषणाई, भगवेध्वज आणि सुंदर मंडपाने स्वामी मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत रुद्राभिषेक होम हवन  महाआरती ,प्रसाद, महिला मंडळ भजन, सद्गुरु सेवा मंडळ भजन, सामुदायिक आरती आणि सायंकाळी सात वाजता ह.भ.प.धनंजय बुवा गद्रे यांचे कीर्तन झाल्यावर स्वामी भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

 

MPC News Podcast 24 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन स्वराज नगरी देखभाल सेवा सहकारी संस्था मर्यादित यांनी (Talegaon Dabhade) अतिशय उत्तमरीत्या आयोजन करून हा चैतन्य उत्सव भक्ती भावाने पार पाडला तळेगाव मधील हजारो स्वामीभक्तांनी आपली उपस्थिती लावली होती.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.