Talegaon Dabhade : श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या (Talegaon Dabhade) ठिकाणी अहिंसेचे पुजारी भगवान महावीर स्वामी यांचा 2449वा जन्म कल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त जैन धर्मियांकडून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त तळेगाव शहरातून रथयात्रा काढण्यात आली.

सकाळी नऊ वाजता भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रथयात्रेत सुरुवात झाली. रथयात्रेत अनिल मेहता,भवरमल संघवी, दिनेश वाडेकर,रमेश निबजिया,प्रकाश ओसवाल हे प्रमुख उपस्थित होते.

रथयात्रेमध्ये संस्कार वाटिकाच्या मुलांचा ढोल लेझीम पथक लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या रथयात्रेमध्ये चांदीचा रथ, चांदीची इंद्रध्वजा, घोडे, बँड, ढोल लेझीम पथक, साधू व साध्वीजी गुरु महाराज,महिला व पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता. लहान मुले विविध वेशभूषेमध्ये या रथयात्रेत सहभागी झाली होती.

नवयुवान ग्रुपने तयार केलेला त्रिशला मातेच्या 14 स्वप्नांचा देखावा रथयात्रेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.रथयात्रेमध्ये अनुकंपादान श्रीमती प्रियाबेन इंद्रलाल शहा परिवार यांच्या वतीने करण्यात आले तळेगाव शहरातील मुख्यमार्गांवरून ही रथयात्रा निघून जैन मंदिर या ठिकाणी गुरु महाराजांचे प्रवचन व त्यानंतर महाप्रसादाने या रथयात्रेची सांगता झाली.

Hinjawadi Traffic : बगाड यात्रेनिमित्त हिंजवडीतील वाहतुकीत बदल

जैन सोशल ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान व आरोग्य शिबिरात 67 लोकांनी आज रक्तदान केले रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना भगवान महावीर स्वामींची चांदीची मुद्रा, धनगोल्ड तर्फे भेट देण्यात आली तर 180 लोकांची हिमोग्लोबिन ( HB ) चाचणी करण्यात आली व 260 लोकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी (Talegaon Dabhade) करण्यात आली.

तसेच त्यांना औषधे मोफत देण्यात आली डॉ निधी ओसवाल, डॉ प्रचिती पाटकर, डॉ पूजा डोंगरे यांनी आरोग्य तपासणी केली तर गरवारे ब्लड बँकेने रक्त संकलन केले. जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय ओसवाल, प्रकल्प प्रमुख किरण ओसवाल व जैन सोशल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.