Court News : प्रेयसीचे प्रयत्न आले कामी; न्यायालयाने लग्न करण्यासाठी कैद्याला दिली पंधरा दिवसांची सुट्टी

एमपीसी न्यूज – प्रेमासाठी वाट्टेल ते, असे म्हटले जाते. (Court News) याचा प्रत्यय कर्नाटक राज्यात आला आहे. हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रेयसीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे उच्च न्यायालयाने अपवादाची स्थिती म्हणून तब्बल 15 दिवसांचा पॅरोल मंजूर देखील केला.

एस. आनंद याला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली. यापूर्वीच त्याचे जी. नीता नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध झाले. त्यानंतर हत्या आणि शिक्षा हा सर्व प्रकार घडला. आनंद दहा वर्ष कारागृहातून सुटणार नसल्याने नीताच्या कुटुंबीयांनी तिचा दुसऱ्या मुलासोबत विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.

घरच्यांनी असा निर्णय घेताच नीताने आनंदच्या आई रत्नम्मा यांच्यासोबत मिळून कर्नाटक उच्च न्यायालयात आनंदला काही कालावधीसाठी जामीन मंजूर करण्याबाबत याचिका दाखल केली.

Talegaon Dabhade : श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक उत्साहात साजरा

नीता मागील नऊ वर्षांपासून आनंदावर प्रेम करीत आहे. आनंद सोबत लग्न करायचे आहे. आनंदला पॅरोल मिळाला नाही तर तिला तिच्या इच्छेविरुद्ध अन्यत्र लग्न करावे लागेल.(Court News) आनंदला हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती नंतर 10 वर्षापर्यंत कमी करण्यात आली होती. त्याची सहा वर्ष शिक्षा भोगून देखील झाली आहेत, असे नीता आणि रत्नम्मा यांनी केलेल्या याचिकेत म्हटले.

यावर युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी म्हटले की, शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला लग्नासाठी पॅरोल मंजूर करण्याची तरतूद कायद्यात नाही. एखादा कैदी न्यायाधीन असेल आणि अटकेत असेल तर त्याला कुटुंबातील, नात्यातील किंवा मित्राच्या लग्नासाठी पॅरोल मिळू शकतो. मात्र शिक्षा भोगत असलेला कैदी स्वतःच्या लग्नासाठी पॅरोल मागू शकत नाही.

त्यावर न्यायालयाने सांगितले की, तुरुंग नियमावलीच्या कलम 636 (12) नुसार न्यायालय इतर कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पॅरोल मंजूर करू शकते. (Court News) त्यामुळे आनंदचा विवाह ही एक विलक्षण परिस्थिती मानून आनंदला पॅरोल मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. आनंदला 5 एप्रिलच्या दुपारपासून 20 एप्रिलच्या संध्याकाळ पर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.