Bhosari : आमदार लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर 30 लाखांच्या खंडणीचा मेसेज

एमपीसी न्यूज – भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे (Bhosari) यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर अज्ञाताने मेसेज पाठवला आहे. त्यामध्ये लांडगे यांच्याकडे 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. मंगळवारी (दि. 4) सायंकाळी अज्ञाताने मेसेज केला. त्यामध्ये 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. परिवर्तन हेल्पलाईनवर काम करणाऱ्या तरुणाने हा मेसेज रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बघितला.

Court News : प्रेयसीचे प्रयत्न आले कामी; न्यायालयाने लग्न करण्यासाठी कैद्याला दिली पंधरा दिवसांची सुट्टी

त्यामध्ये 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. (Bhosari) तसेच खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अशाच प्रकारची धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील आली होती. त्या प्रकरणात आरोपींनी आम्ही आठ जण असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच धर्तीवर भोसरी मध्ये प्रकार समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.