Talegaon Dabhade : कामगारांचा छळ आणि कंपनीच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत विप्रो लॅबोरेटरीज कंपनीची चौकशी व्हावी

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची तळेगाव पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कामगारांचे आर्थिक शोषण करणे तसेच कामगारांना दुय्यम वागणूक देण्यात येत असल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील विप्रो लॅबोरेटरीज प्राइवेट लिमिटेड या कंपनीची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केली.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मानवाधिकारचे संतोष दाभाडे यावेळी उपस्थित होते.

पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीत कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींचे कंपनी प्रशासन मानसिक व आर्थिक शोषण करत आहे. तसेच त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे. कंपनीमधील कार्यरत महिला व पुरुष कर्मचार्‍यांना ठराविक वेळेपेक्षा धमकावून अतिरिक्त वेळ थांबून काम करून घेतले जात आहे. अधिक कामाचा कोणताही मोबदला कामगारांना दिला जात नाही. महिलांची प्रसूती रजा नाकारणे, परमनंट कामगारांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून काढून टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. हार्मफुल केमिकल स्मॉल मॉलिक्युलर मनुफॅक्चरिंगची परवानगी, केमिकल वेस्ट डिस्पोजल योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबतची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.