Talegaon Dabhade : समर्थ शिक्षण संकुलामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवीचे वाटप

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील रोटरी क्लब ऑफ(Talegaon Dabhade )एमआयडीसी, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत समर्थ शिक्षण संकुलामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.

नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नूतन कॉलेज (Talegaon Dabhade) ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष, नु . म . वि. प्र. मंडळाचे सचिव संतोष खांडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे अध्यक्ष रो. राहुल खळदे, सचिव सुनील खोल्लम, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक श्री दामोदर शिंदे, महेशभाई शहा, शंकर नारखडे प्रकल्प प्रमुख रो. विन्सेंट सालेर, रो. अजय पाटील, रो. अंतोष मालपोटे, रो. कीर्ती हिरे, एनएमआयईटी चे प्राचार्य डॉ. विलास देवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Israel-Palestine Conflict : इस्रायलने पुकारले युद्ध; भारत इस्त्रायलच्या पाठीशी

अध्यक्ष स्थानावरून बोलताना संतोषजी खांडगे म्हणाले की, “मनुष्याने स्वतःच्या उपयोगासाठी प्लास्टिकचा शोध लावला हाच शोध मानवी सार्वजनिक आरोग्यासाठी घातक बनला आहे. मानवी गरजेचा हव्यास बनवल्याने मागील दोन दशकात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून प्लास्टिकचे उच्चाटन करणे अत्यंत गरजेचे आहे”,

विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कशाप्रकारे योगदान करू शकतो या आशयाची शपथ सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. राहुल खळदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. शेखर रहाणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.