Talegaon Dabhade : रोटरीच्या आंतरशालेय रामरक्षा पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राम रक्षा पठण स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मागील 30 वर्षांपासून रोटरी क्लब सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.

त्या अंतर्गत रोटरीच्या वतीने यावर्षी आंतरशालेय राम रक्षा पठण स्पर्धा घेण्यात आली. या वर्षी सांस्कृतिक उपक्रमांतर्गत पी आय डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रामरक्षा पठण स्पर्धा कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब हॉल येथे संपन्न झाली. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटातून झालेल्या स्पर्धेत 18 शाळांमधून 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

निकाल पुढील प्रमाणे

दोन दिवस चालेल्या स्पर्धेवेळी दोन्ही दिवस रामरक्षेचे सामूहिक पठण घेण्यात आले.

5 वी ते 7 वी गटातील विजेते –

प्रथम क्रमांक – सौरभ प्रदीप शिंत्रे. इ 6 वी सरस्वती विद्या मंदिर
द्वितीय क्रमांक – श्रेयस शुभाष महाले इ 6वी आदर्श विद्या मंदिर
तृतीय क्रमांक – हर्षिल बकुल भाटिया इ 7वी जैन इंग्लिश स्कूल

उतेजनार्थ –

1 वेदांग विशाल जोशी इ 7 वी बाल विकास विद्यालय
2 श्रावणी सागर देशपांडे इ 5 वी बाल विकास विद्यालय

8 वी ते 10 वी गटातील विजेते

प्रथम क्रमांक  – पूर्वेश चंद्रशेखर जोशी इ 10वी बालविकास विद्यालय
द्वितीय क्रमांक  – श्रुती सुमंत नाईक 10 वी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन
तृतीय क्रमांक  – पीयुष सर्वेश एरंडे इ 10 वी आदर्श विद्या मंदिर

Vadgaon Maval : विस्तार अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी अटक

उत्तेजनार्थ – 
1 तनिष्का संदीप वढावकर इ 10 सरस्वती विद्या मंदिर (Talegaon Dabhade)
2 मुक्ता गणेश कुलकर्णी इ 10 वी नवीन समर्थ विद्यालय

सर्व विजेत्यांना रोटरी क्लब तर्फे सन्मान चिन्ह तसेच संदीप जोशी यांच्या ” टॉय वर्ल्ड ” तर्फे भेट वस्तू देण्यात आल्या.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व डॉ नेहा कुलकर्णी यांच्या वतीने रामरक्षाची पुस्तके व पेढे वाटण्यात आले.

अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेंथे, फर्स्ट लेडी अर्चना चितळे यांच्या पुढाकारातून व पब्लिक इमेज टीम ( भालचंद्र लेले, अरुण बारटक्के, वेदांग महाजन, गुरूप्रसाद कुलकर्णी, आन्स नीलिमा बारटक्के, सुचित्रा कुलकर्णी, मृण्मयी महाजन, धनंजय मथुरे )यांच्या विशेष परिश्रमातून ही स्पर्धा पार पडली.

आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे,अशा परिस्थितीत मनाला शांती, स्थैर्य डिप्रेशनच्या नावाखाली खचून जाणाऱ्या नव्या पिढीला खंबीर, मानसिक आधार देणारी, वेळेअभावी, स्पर्धेच्या युगात मागे पडत चाललेल्या रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेची निवड करण्याचे ठरविल्याचे प्रकल्प प्रमुख हृषिकेश यांनी सांगितले.

परीक्षक म्हणून संस्कृतचे गाढे अभ्यासक रमेश चंद्रात्रेय,संस्कृत अध्यापिका आशा कऱ्हाडे, दासबोध कथा अभ्यासिका वंदना पत्की,संस्कृत विशारद ज्योती मुंगी,संस्कृत अध्यापिका जयश्री जोशी आदींनी काम पाहिले.

माजी अध्यक्ष आनंद असवले,संजय अडसूळ,विकास उभे,प्रसाद मुंगी व कीर्ती मोहरीर यांनी विशेष सहकार्य केले.बहुतांश रोटरी सदस्य स्पर्धेला उपस्थित होते.सूत्रसंचालन नीलिमा बारटक्के यांनी केले.आभार प्रकल्प प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.