Talegaon Dabhade : बँकेत जाण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन मित्र पसार

एमपीसी न्यूज – बँकेत जाण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन मित्र दुचाकीसह पसार झाला. ही घटना 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मावळ तालुक्यातील आंबळे येथे घडली. याबाबत 14 मार्च रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज दादासाहेब जगदाळे (वय 33, रा. वडगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शेख खाजा उर्फ सागर राठोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे. त्याने जगदाळे यांचा विश्वास संपादन करून बँकेत जाण्याच्या बहाण्याने त्यांची 45 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 06 / ए आर 1761) घेतली. दुचाकी घेऊन गेलेला शेख अदयाप पर्यंत परत आल्याने त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.