Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांचेकडे सुपूर्द केला.यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष,जनसेवा विकास समिती व आरपीआय या महाआघाडीची सत्ता असून 2016 साली खळदे या जनसेवा विकास समितीकडून प्रभाग क्र. सहा मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. खळदे यांनी इतरांना संधी प्राप्त व्हावी म्हणून आपल्या विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

विरोधीपक्ष नेतेपदावर आता कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या राजीनाम्याच्या प्रती गटनेत्या सुलोचनाताई आवारे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, सभागृहनेते सुशील सैंदाणे यांचेकडे खळदे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.