Talegaon Dabhade : माय माऊली फाऊंडेशन आणि लोकमान्य हॅास्पिटलतर्फे रविवारपासून ऑर्थेा सुपर स्पेशालिटी शिबिर

एमपीसी न्यूज – लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि माय माऊली फाऊंडेशन व माय माऊली जेष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 8 ते दि.14 मार्च दरम्यान आर्थो सुपर स्पेशालिटी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नाव नोंदणी करून विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, फ्रॅक्चर या सारख्या आजारावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जाणार आहेत. तसेच एक्सरे, सी टी स्कॅन, एम आर आय सारख्या तपासण्यावर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये महात्मा फुले योजना धारकांसाठी मणक्याच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्र डॅाक्टरांची फौज असणाऱ्या लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आत्तापर्यंत एक लाखापेक्षा अधिक यशस्वी अस्थिरोग शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच सांधेरोपण शस्त्रक्रिया व रोबोट च्या सहाय्याने ५००० च्या वर यशस्वी गुडघेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शिबिराचा लाभ घ्येण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून 9922937104 / 9175998603 या नंबरवर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like