Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिथुन काकडे

एमपीसी न्यूज – गुढीपाडवा निमित्त (दि.9 एप्रिल) तळेगावचे (Talegaon Dabhade ) ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव आयोजित करण्यात आला आहे.या निमित्त होणाऱ्या सामाजिक,सांस्कृतिक, विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संयोजन समितीची निवड करण्यात आली.ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिथुन मारुती काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला सालाबाद प्रमाणे मावळ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या तळेगावच्या ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिथुन मारुती काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये श्री काकडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावर्षी दि. 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा येत असून या निमित्त होणाऱ्या सामाजिक,सांस्कृतिक,विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाचे (Talegaon Dabhade ) नियोजन करण्यासाठी संयोजन समितीची निवड करण्यात आली.

Talegaon Dabhade : समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत आर्या अहिरे प्रथम

यावेळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती वार्षिक कार्यकारीणी 2024-25 पुढील प्रमाणे –

अध्यक्ष – मिथुन मारुती काकडे,

खजिनदार – प्रणव विक्रम दाभाडे ,

सरचिटणीस – सुधीर मनोहर सरोदे,

प्रसिद्धी प्रमुख-स्मितेश संभाजी भेगडे,

कार्याध्यक्ष -स्वप्निल शामराव दाभाडे,

उपाध्यक्ष-गौरव परदेशी, सौरभ जाधव

सहखजिनदार – अमर जगदाळे, रोहित करपे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.