Talegaon Dabhade : समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत आर्या अहिरे प्रथम

एमपीसी न्यूज – प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये (Talegaon Dabhade) गुणवत्ता वाढावी व भविष्यातील स्पर्धा परीक्षांचे आकलन व्हावे म्हणून समर्थ शलाका स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील नववीच्या वर्गातील आर्या अहिरे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व दिवंगत अ‍ॅड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट आणि समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सभागृहात नुकतेच पारितोषिक वितरण झाले.

Dehuroad : गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,विस्तार अधिकारी मिनीनाथ खुरसूले,संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,
खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार,संस्था संचालक (Talegaon Dabhade) दामोदर शिंदे, महेश शहा,विनायक अभ्यंकर,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत सन 2023-24 यावर्षी इयत्ता चौथी मध्ये 171 विद्यार्थी, इयत्ता सातवी 397 विद्यार्थी,इयत्ता नववी मध्ये 663 विद्यार्थी व इयत्ता अकरावी मध्ये 219 विद्यार्थी असे एकूण 1350 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.या परीक्षेमधून प्रथम,द्वितीय,तृतीय व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थी तसेच प्रत्येक शाळेतील प्रथम विद्यार्थी (प्रोत्साहनपर विद्यार्थी) या प्रकारे निवड करण्यात आली.

यावेळी संतोष खांडगे यांनी प्रास्ताविकांमधून स्पर्धा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. गणेश खांडगे यांनी भविष्यात पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. संस्थाध्यक्ष संजय भेगडे यांनी दिवंगत अ‍ॅड शलाका खांडगे हिस आदरांजली वाहून स्पर्धा परीक्षांच्या उपयुक्तते बद्दल मार्गदर्शन केले. सुदाम वाळुंज यांनी उपक्रमाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रभा काळे यांनी सूत्रसंचालन केले. महेश शहा यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.