Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज – राज्य निवडणूक आयोग,जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पुणे यांचे सूचनेनुसार मावळ तहसील कार्यालय व (Talegaon Dabhade) इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार (दि.14) रोजी नवमतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले.

Pune : रावबहादूर गणपतराव केंजळे यांनी बांधलेल्या नव्या पुलाची ‘शंभरी’

शिबिराचे उद्घाटन मावळचे निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस के मलघे,तलाठी कविता मोहमारे, महाविद्यालयाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थितीत होते.

नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी नवमतदार नोंदणी का आवश्यक आहे.त्यातून देशाच्या लोकशाहीला मोठी बळकटी कशी मिळेल यावर त्यांनी मोठे भाष्य विद्यार्थ्यांसमोर केले. उद्याच्या भारताच्या लोकशाहीचे भविष्य तरूणांच्या खांद्यावर आहे. चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावयाचे असतील तर सुज्ञ मतदारांची गरज लोकशाहीला असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

त्याच दृष्टिकोनातून मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फाॅर्म नंबर 6 व 7 ऑनलाइन, ऑफलाईन कसा भरावा याविषयी माहिती दिली. इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवमतदार नोंदणी कार्यक्रमात मोठा सहभाग घेतल्याने त्याबद्दल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले की,उद्याच्या नवभारताची निमिर्ती करण्यासाठी तरूणांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. आपल्या भारत देशात 18 ते 35 वयोगटातील तरूण युवक -युवतीची 65 टक्के लोकसंख्या आहे. आजची तरुणाई उद्याच्या महासत्ता बनू बघणा-या भारत देशाचा भक्कम पाया आहे.

शिक्षित तरूण मतदार म्हणून जर योग्य भूमिका बजावू लागले, तर राजकारण,समाजकारण, अर्थकारण यांचा स्तर उंचावण्यास निश्चितच मदत होईल. त्यामुळे सर्वांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. मलघे यांनी सांगितले. तसेच आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नवमतदार म्हणून मतदार यादीत नोंदणी करतील असेही अधिकाऱ्यांना डाॅ मलघे यांनी आश्वासित केले.

यावेळी तलाठी मोहमारे यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष नोंदणी अर्ज भरुन घेतले. तसेच काही समस्या जाणून घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील अनेक युवक युवतींनी या शिबिरात नवमतदार म्हणून नाव नोंदणी केली. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. आर. आर. भोसले व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा .दीप्ती पेठे यांनी मतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. मिलींद खांदवे यांनी केले तर आभार प्रा.दीप्ती पेठे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.