Bhosari : चोरीची गाडी घेऊन पडला आणि थेट गाडी मालकाला सापडला

एमपीसी न्यूज – असं म्हणतात जग खूप छोटं आहे. त्यामुळे (Bhosari) काही व्यक्ती तुम्हाला परत परत भेटतात. असाच काहीच किस्सा एका दुचाकी चोरासोबत घडला.

त्याने दुचाकी चोरली, तो तिच्यावर बसून फिरत होता, फिरत असताना तो एका ठिकाणी रस्त्यावर घसरून पडला. योगायोग असा की तो पडल्यानंतर थेट गाडी मालकालाच सापडला. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.14) दिघी येथे घडला.

कृष्णा दत्तात्रय म्हेत्रे (रा.भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात आप्पासाहेब माधव महाडिक (वय 31, रा.दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : रावबहादूर गणपतराव केंजळे यांनी बांधलेल्या नव्या पुलाची ‘शंभरी’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची पार्क केलेली दुचाकी पार्किंगमधून चोरली. चोरून तो ती गाडी फिरवत होता. दुसरीकडे फिर्यादी त्यांची गाडी शोधत होते.

योगायोग असा झाला, की आरोपी गाडी घेऊन फिरवत असताना (Bhosari) तो दत्तनगर येथे गडीसह घसरून पडला. यावेळी फिर्यादीच्या निदर्शनास आले की पडलेली गाडी ही त्यांचीच आहे. त्यांनी तातडीने आरोपीला पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र या घटनेने चोरी केल्यानंतर कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तर ती कधी ना कधी उघडी पडते. हे मात्र सिद्ध झाले. दिघी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.