Talegaon Dabhade : गावठी कट्टा बाळगणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात 

एमपीसी न्यूज- गावठी कट्टा बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक मोपेड असा ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा अल्पवयीन मुलगा गावठी कट्टा घेऊन इंदोरी गावच्या हद्दीमध्ये इंदोरी बायपास येथील हॉटेल जायका समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या बातमीची खातरजमा करून पोलिसांनी सादर ठिकाणी सापळा रचून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक टीवीएस कंपनीची मोपेड असा ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपार पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. बी. उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती एस एस पाटील, पोलीस हवालदार चव्हाण, आंबेकर, पोलीस नाईक सोरटे, पोलीस कॉन्स्टेबल तरडे, शेखरे, कोकणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.